विरोधी पक्षनेते देवेंद्र यांना एका प्रकरणात न्यायलयात हजर राहावे लागल्यानंतर आता भाजपा आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. त्यावर आता भाजपानं कार्टूनच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
भाजपानं हे कार्टून टि्वट केलं आहे. त्यात देवेंद्र फडणवीस कोर्टात जाताना दाखवले आहेत. त्यांच्या हाती एक फाईल आहे, त्यावर “जनतेसाठी आंदोलन करतानाचा खटला” असं लिहिलेलं आहे. त्यांच्या मागे तिघे दाखवले आहेत. त्यात शरद पवार, अजित पवार, जितेंद्र आव्हाड आहेत. “लपवाछपवी करू नका!” असं त्यांना म्हणताना दाखवलं आहे. पण हे दाखवतानाच त्यांच्या मागे एक कपाटात घोटाळ्यांच्या फायली बाहेर येताना दिसताहेत. त्यात सिंचन घोटाळा, लवासा घोटाळा, राज्य सहकारी बँग घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा… अशा फायलींचा समावेश आहे. यावर कार्टूनमध्ये “लोका सांगे ब्रह्मज्ञान…” असा एक टोला लगावलाय. हे कार्टून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.